वैद्यकीय तंत्रज्ञानाने आज इतकी प्रगती केली आहे की, जन्मतः ऐकू न येणारी मुलेही आता आवाजाच्या जगात प्रवेश करू शकतात. ‘कॉक्लियर इम्प्लांट’ (CI) ही या तंत्रज्ञानाची एक मोठी देणगी आहे. नुकत्याच केलेल्या एका सखोल अभ्यासादरम्यान, अनेक डॉक्टर्स, तज्ज्ञ आणि लाभार्थी कुटुंबांशी संवाद साधला. या अभ्यासातून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे – ही शस्त्रक्रिया म्हणजे यशाचे शेवटचे टोक नसून, एका मोठ्या संघर्षाची ही केवळ सुरुवात

